
फुन्दासिओन मेन्तेक्लारा आणि
सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठ इतिहास विभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
निबंध स्पर्धा
मिडवे फिल्म्स निर्मित वैभव कांबळे यांच्या
रेव्होल्यूशन: पुस्तकांपासून ते बाबासाहेबांपर्यंत
REVOLUTION: From the books to Babasaheb
https://www.youtube.com/watch?v=uVcwRvqPCnA
या चित्रपटावरील सर्वोत्कृष्ट संशोधनपर लेख लिहिण्याची ही स्पर्धा आहे.
सर्वोत्तम पाच लेख २०२० मध्ये रेविस्टा साएंटिफिका आर्बिट्रादा दे ला फुंदासिओन मेन्तेक्लारा च्या अंकात प्रकाशित केले जातील. त्यापैकी पहिल्या तीन लेखांना सन्माननीय उल्लेख प्राप्त होतील आणि त्यांचे लेख समतावादी तत्वज्ञानावरील विशेष संपादित ग्रंथात समाविष्ट केले जातील. शिवाय लेखक त्या ग्रंथाच्या चर्चेत भाग घेऊ शकतात.
३००० ते ५००० शब्दाचे मराठी किंवा इंग्रजी भाषेतील लेख 30 मार्च 2020 पूर्वी सादर करणे आवश्यक आहे.
जातीच्या आणि पुनर्जन्माच्या संकल्पना या शोषितांच्या इच्छा आकांक्षा, स्वत्व आणि विकास यांना कशा बाधक ठरतात, यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही कसे दिशादर्शक आहेत हे सांगून त्यांच्या लेखनाचे, कार्याचे आणि भाषणांचे सार वरील माहितीपटावरील स्पर्धेच्या लेखात आले पाहिजे. बाबासाहेबांच्या समतावादी तत्वांना, विशेषतः त्यांच्या पश्चात् पसिद्ध झालेला ग्रंथ ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथाला प्रस्तुत निबंधात अधोरेखित केले पाहिजे. कोणत्याही विद्यापीठाचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. संशोधकीय पदवी प्राप्त न केलेल्या पण संशोधनाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीदेखील यात सहभागी होऊ शकतात. संबंधित लेखाचे सादरीकरण कुठल्याही पदवीशी संबंधित नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
सहभागींनी लेखनसंबंधी नैतिक मूल्यांचे आणि संपादकीय पद्धतींचे
घोषणापत्र भरणे आवश्यक आहे.
ते येथे उपलब्ध आहे-
https://fundacionmenteclara.org.ar/revista/index.php/RCA/pages/view/ethical-standards
खालील लिंकवर दिलेल्या नियमावलीचे पालन करूनच लेख जमा करावा.
https://fundacionmenteclara.org.ar/revista/index.php/RCA/Normas_envio
स्पर्धेची उद्दिष्टे
१. विद्यार्थ्यांना संशोधन पद्धती आणि शास्त्रीय लेखन संबंधीचे अभ्यासकीय प्रशिक्षण देणे.
२. भविष्यातील पदवीधरांमध्ये समता, सर्वसमावेशक तंत्रज्ञान आणि अधिक न्याय्य सार्वजनिक धोरणांच्या विकास यांच्या बद्दल वचनबद्धतेची भावना तयार करणे.
बाह्य परीक्षकांद्वारे डबल ब्लाइंड प्रक्रिया पार पाडलेल्या लेखांचे मूल्यमापन भारतीय आणि आर्जेंटीनातील वैज्ञानिक समितीच्या सदस्यांद्वारे केले जाईल.
वैयक्तिक लागेबांध्यांचा संघर्ष टाळण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापकांना अंतिम परीक्षण प्रक्रियेमधून वगळण्यात आले आहे. म्हणजेच निबंधाचे परीक्षण हे संबंधित लेखकांना न ओळखणाऱ्या बाहेरच्या तज्ञांकडून केले जाईल.
आपली संशोधनासंबंधीची पार्श्वभूमी सोबत जोडून लेख सदर लिंकवर पाठवावे. info@menteclara.org
ऑस्कर आर. गोमेझ
संचालक
रेविस्टा साएंटिफिका आर्बिट्रादा दे ला फुंदासिओन मेन्तेक्लारा
श्रद्धा कुंभोजकर
इतिहास विभाग प्रमुख
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. भारत